भ्रष्टाचाराशी लढा देणारा कार्यकर्ता : श्री. अशोक किसनरावजी राऊत.... एक अष्टपैलू व्यक्तिमत्व

By  GAJANAN RAUT on 

भ्रष्टाचार मुक्त भारताचे स्वप्न प्रत्येक भारतीयाचे आहे भ्रष्टाचाराची विषवल्ली एकट्या भारत देशाला नाही तर साऱ्या जगाला पुरते जेरिस आणत आहे सरकारने भ्रष्टाचार चा बीमोड करण्या साठी कठोर कायदे प्रभावशाली उपाय योजना केलेल्या आहेत परंतु त्याची प्रभावशील पणे अंमलबजावणी होत नसल्याने ह्या सरकारी योजना केवळ मृगजळ ठरत आहेत शासकीय  तसेच निमसरकारी कार्यालयात लाच देणे आणि लाच घेणे जरी कायद्याने गुन्हा असला तरी काही आपवाद वगळता लाच दिल्या शिवाय कामच मार्गी लागत नसल्याचे भयावह चित्र देशात निर्माण झाल्याचे वास्तव आहे आजमितीस या भ्रष्टाचाराच्या विषवल्ली ला मुळातून उखडून टाकन्या साठी प्रत्येकानेच दोन हात करणे गरजेचे आहे केवळ "घेणे आणि देणे" चा कलगीतुरा वाजविन्या पेक्षा काळाबाजार करणाऱ्या व्यस्थेचा च बुरखा फाडने देशहिताचे ठरणार आहे असेच भ्रष्टाचाराचा बुरखा फाडनारे व्यक्तीमहत्व म्हणजे श्री. अशोक किसनराव राऊत हे मौजे उटी येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी गत दहा वर्षापासून ता. महागांव कृषी उतपन्न बाजार समिती मध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराला प्रकाश झोतात आणण्यासाठी महत्वकांशी प्रयत्न केले 
महागांव तालुका हा यवतमाळ जिल्ह्याअंतर्गत येतो तालुक्यामध्ये कार्यरत असलेल्या  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मौजे फुलसावंगी, काळी दौलत खान, ह्या दोन उपबाजार समित्या आहेत.या समित्यांनी गत अनेक वर्षापासून व्यापारी वर्गाला हाताशी धरून आपलेच उखळ पांढरे करण्यालाच धन्यता मानलेली आहे माल खरेदीत "मापात पाप "करुन शेतकरी वर्गाची मोठी आर्थिक भरडन केलेली आहे. समितीची आर्थिक परिस्थिती डबघाईस आलेली असतानाच संचालक मंडळाने केलेल्या नौकर भरती लाही भ्रष्टाचाराची किनार लागलेली आहे या बेलगाम आणि अफलातून व्यव्हाराची चौकशी करण्यासाठी श्री. अशोक किसनराव राऊत यांनी प्रानांतिक उपोषणाचा मार्ग पत्करून साऱ्या जिल्ह्याचे, नव्हे तर 
सहकार आणि पणन मंत्रालयाचेही लक्ष वेधले आहे आजमितीस उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मध्यस्थितीने त्यांचे उपोषण सुटलेले आहे भ्रष्टाचार प्रकरानाची मुळातुन चौकशी करन्याचे मंत्रालयातुन आदेश ही पारित झालेले आहेत गरज आहे ती निर्मळ पारदर्शक चौकशी होण्याची भ्रष्टाचारा विरुद्ध निकराचा लढा देणाऱ्या या समाज सेवकास "जागल्या"टीम च्या वतीने दिल से सलाम .............

 

स्तंभ लेखन :गजानन राऊत (मुक्त पत्रकार वृत्तपत्र विद्या पदवीधर  जागल्या टीम  )