दिल्ली है दिलवालोंकी, दिल्ली है आपकी!

By  Ajesh Pawar on 

'दिल्ली' है दिलवालोंकी, दिल्ली है 'आप' की!
- अजेश पवार.
______________________________________

काल दिल्लीत 'आप' ने निवडणूका जिंकून खरं तर माझ्या वाढदिवसी मला गिफ्ट दिल्यासारखे फिल आलं. आप ने मागच्या पाच वर्षात मुलभूत गरजा व स्थानिक मुद्यांवर काम केले. लोकोपयोगी कामे केली. वीज, पाणी, शिक्षण, दवाखाने, प्रदुषण, रस्ते, सार्वजनिक वाहतूक ईत्यादी स्थानिक मुद्यांवर/कामांवर त्यांनी मते मागितली. कुठलीही फसवा फसवी केली नाही. म्हणून दिल्लीकरांनी मनात कुठलीही भिती व ईर्षा न बाळगता 'झाडू' वर क्लिक करून 'आप' ला भरघोस मतांनी निवडून दिले.  दिल्लीची जनता धार्मिक ध्रवीकरणाला बळी पडली नाही. जनतेने विकासाला म्हणजेच 'आप' ला मतदान केले. त्याबद्दल आपचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

त्यांच्या उलट, भाजपा ने ही निवडणूक जिंकण्यासाठी हवी तशी सगळी ताकद वापरली. साम-दाम-दंड-भेद ही निती वापरत निवडणूकीत उतरले. ११ राज्यांचे आजी माजी मुख्यमंत्री, ३७४ पेक्षा जास्त खासदार, अनेक माजी-आजी मंत्री महोदय निवडणूक प्रचारात उतरले. जेएनयू, जमिया-मिलिया विद्यापीठ, अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, शाहीनबाग आंदोलन, राष्ट्रवाद (बेगडी), अर्बन नक्षली, तुकडे तुकडे गँग (😂), केजरीवाल दहशतवादी (😝), CAA वगैरे वगैरे मुद्दे प्रचारात वापरले. अगदी भारत विरुद्ध पाकीस्तान अशा प्रकारे ही निवडणूक नेली गेली. भाजपाने ही निवडणूक पूर्णतः राष्ट्रीय मुद्यांवर आणि काल्पनिक मुद्यांवर लढवण्याचा प्रयत्न भाजपाने केला. त्यात ते सपशेल फसले. 

भाजपाच्या या मुद्यांसाठी भारतीय माध्यमे सुद्धा प्रचारात उतरली. अर्णब गोस्वामी, सुधीर चौधरी, अमिष देवगण, अंजना ओम कश्यप, रजत शर्मा असे न्यूज चॅनल चे अँकर जणू काही भाजपाचेच ते प्रतिनिधीत्व करत होते. स्टुडिओत विरोधक पॅनालिस्ट वर बोंबलून, ओरडून त्यांचे स्थानिक मुद्दे कसे महत्वाचे नाहीत. काल्पनिक व राष्ट्रीय मुद्दे हेच दिल्ली निवडणुकांचे मुद्दे असावेत, हेच हे अँकर पुर्ण देशाला सांगत होते.

कॉंग्रेस या सगळ्यात कुठेच नव्हती. १५ वर्षे कॉंग्रेस ने दिल्ली शाबूत ठेवली होती. शिला दिक्षित या दिल्ली मेट्रोच्या शिल्पकार आहेत. दिल्ली मेट्रो मुळे तिथली शहर वाहतूक बऱ्यापैकी सुरळीत आहे. पण मागची काही वर्षे कॉंग्रेस ने काहीही धडपड दिल्लीत केलेली नाही. किंबहुना कुठेच केलेली नाही. त्यांना मतदार भाजपा ला प्रतिस्पर्धी म्हणून थोडीफार आशा बाळगून मतदान करतात. कॉंग्रेसने या संधीचा फायदा घेऊन काम केल्यास आणि दिवसरात्र पक्षवाढीसाठी मेहनत घेतल्यास कॉंग्रेस ला काहीही अशक्य नाही. आळशीपणा आणि जुने खोडकर नेते हेच कॉंग्रेसची खरी अडचण आहे. त्यात युवराज विदेशात कधी जातात, जाग आली की भारतात येतात. एक दोन सभा घेतात आणि त्यातही महत्वाच्या मुद्यांवर भाषण न करता वेगळेच मुद्दे भाषणात घेतात. त्या वेगळ्या मुद्यांवर ट्विटर आणि इतर समाज माध्यमांवर ट्रेंड चालतात. असो.

'आप' चा विजय फक्त दिल्लीसाठी नव्हता तर इतर राज्यात येणाऱ्या संभाव्य निवडणूकांसाठी महत्वाचा आहे. पश्चिम बंगाल, बिहार या राज्यांत पुढिल निवडणूका आहेत. भाजपा जीव ओतून अनेक मुद्दे (दिल्ली सारखे) प्रचारात घेऊ शकतात. तिथल्या लोकांनी दिल्लीच्या सुज्ञ आणि जागरूक लोकांचा आदर्श घेऊन भाजपाला नाकारावे, असे आवाहन करावेसे वाटतेय. आजपर्यंत दिल्ली बडे दिल वालों की असं ऐकले होते. ती बडे दिलवालोंकी च आहे, हे कालच्या निकालावरून दिसून आले. दिल्ली करांचे मनःपुर्वक अभिनंदन. तुमचे विकासाचे मॉडेल पुर्ण देशाने स्विकारावा ही मनी ईच्छा आहे.

संविधान, विकास व लोकशाही मानणारे लोकं या निमित्ताने दिल्लीकरांच्या रूपाने देशाने बघितले, हीच या निवडणुकीची खासियत होती. 

'आप' व पुर्ण दिल्लीकरांचे पुनःश्च अभिनंदन व आभार!

जय भीम, जय भारत।
जय संविधान!

-- अजेश पवार.
१२.०२.२०२०