आपल्या देशात मृत्यूनंतरही संपत नाही वैर, होते मृतदेहाची विटंबना !

By  milind dhumale on 

मृत्यूनंतर वैर संपतं असं म्हणतात.
या देशात मृत्यूनंतरही जात पिच्छा सोडत नाही.


गावातले माजी सरपंच रामभाऊ औंधे धर्म लिंगायत.
हे स्पष्ट करणे गरजेचे कारण मुद्दाच तो आहे.अन हिंदुत्ववादी लिंगायत हा हिंदू धर्माचाच भाग आहे पंथ आहे अशी थाप मारत फिरत असतात.


खासकरून आरएसएस अलीकडे तर मुस्लिम सुद्धा हिंदू म्हणायची खेळी खेळली जातेय.नुसती फसवाफसवी अन मेंदू नासावण्याचे प्रकार.तर या माजी संरपंचांच्या पत्नीचे निधन झाले.


त्या बिचाऱ्या माउलींच्या मृत्यूनंतरही अपमान अहवेलना वाट्याला आली.
या देशात आपल्या जीवंत शरीराची विटंबना कुचंबना अपमान होतोच.परंतु आपल्या मृत शरीराची/शवाची सुद्धा विटंबना होते.


दलितांसाठी तर हे नेहमीचच,त्यांना वेगळ्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करायचे असतात.हिंदुच्या केले तर धर्म बाटतो.याचा प्रत्यय सांगलीच्या कडेगाव तालुक्यातल्या वांगी याठिकाणी आला आहे.इतरवेळी हे दलित सुद्धा हिंदू असतात.गर्व से कहो हम...


लिंगायत स्मशानभूमीच्या जागेच्या वादातून एका महिलेचा अंत्यविधी 26 तास रखडला होता. रविवारी ( 26 जानेवारी 2020 ) वांगी गावचे माजी सरपंच रामभाऊ औंधे यांच्या पत्नी रुक्मिणी औंधे यांचे निधन झाले.


शेवटचा प्रवास,पण दफनभूमी सुद्धा नशीब झाली नाही.शेवटी त्यांना त्यांच्याच घराजवळ दफन करण्यात आले.तब्बल 26 तास मृतदेह रखडवून दुसऱ्या समाजाने लिंगायत समाजातील मृतदेह दफन करण्यास आक्षेप घेतला.


दुसरा समाज कोण? हे मात्र बातमीत सोयीने दडवून बातमी केली गेलीय.
मुद्दा हा आहे की यावरून स्पष्ट होतं की लिंगायत समाज-धर्म हा हिंदू धर्माचा भाग कधिही नव्हता नाही.आम्हाला स्वतंत्र धर्माचा दर्जा द्या ही त्यांची जुनी मागणी आहे.आणि ती म्हणूनच रास्त देखिल वाटते.


रुक्मिणी यांचा मृतदेह सुद्धा शेवटचे अंत्यसंस्कार करू न देण्याचा अमानवीपणा या देशात घडून येतो.आणि गंमत म्हणजे सत्तेवर असणारे भाजप सरकार देशाचे नागरिक नसणाऱ्या लोकांना देशात आणायला उत्सुक आहे.


आमचा प्रश्न हाच आहे.अन हीच मागणी सातत्याने करतो आहोत की तुम्हाला जगाला तुमचा काय तो फाजिल दांभिक मानवतावादी दृष्टीकोन दाखवून मिरवून घ्यायचे ते जरूर घ्या.पण अगोदर देशातील व्यवस्था नीट करा.लोकांना अगोदर आपल्याच देश बांधवांशी माणुसकीने वागायला शिकवा.आपण अगोदर आदर्श निर्माण केला पाहिजे.


आपणच दारू पिऊन गटारात लोळत उकिरडे फुकत घरही फुकायचे अन बाहेरच्या पाहुण्यांना घरी येण्याचे आमंत्रण देत त्यांना कुटुंबांचे सदस्य करायचे याच्यापेक्षा मोठा विनोदी मुर्खपणा जगात कुठेच घडला नसेल.परंतु तीन माथेफिरूंच्या अट्टाहासासाठी संपूर्ण देशाला आज वेठीस धरले जाते आहे.


एखाद्या अधिकृत नागरिकाला मृत्यूनंतरही जर या देशाच्या मातीत मिसळायला जात-धर्म आडवा येत असेल तर आपण देश म्हणून नक्की काय आहोत? मानवीय पातळीवर आपण कुठे आहोत हे तपासून घेण्याची अन मुलभूत गोष्टी अगोदर नीट करण्याची या देशाला नितांत गरज आहे.यासाठी आणखी किती पिढ्या बरबाद होणार आहेत?


तरुणांनो तुम्ही हा बदल नक्कीच घडवून आणू शकता,फक्त चुकीच्या धारणा चुकीचे अजेंडे चुकीच्या धोरणांना बळी पडू नका.देशासाठी हे कार्य हाती घ्या.अन्यथा येणाऱ्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत.


 - मिलिंद धुमाळे 

 

बातमी स्त्रोत - https://marathi.abplive.com/news/maharashtra/a-womans-funeral-was-postponed-for-26-hours-due-to-cemetery-premises-issue-736082?fbclid=IwAR2fgmWMcVMZioJWvg1TbxdXOtyzGz3-MxCfAqfhpGcOqJrWnLcs8lMb2Wg