भाजपचा परतीचा प्रवास अन हिंदू बहुजन समाज

By  milind dhumale on 

मोदी लाट ओसरायला लागल्याचे चित्र स्पष्ट झाले असून देशातून भाजपची जोरदार पीछेहाट सुरु झाल्याचे दिसत आहे.भाजपच्या निरंकुश आततायी धोरणांना जनता कंटाळून गेली असून दुसरीकडे महागाई बेरोजगारी आणि आणि शिक्षणापासून वंचित राहिल्याने हवालदिल झाल्याचे चित्र देशात निर्माण झाल्याचे बघायला मिळत आहे.


यातूनच महाराष्ट्रात जो सत्तेच्या हव्यासाचा खेळ खेळला गेला त्याने भाजपबद्दल लोकांची उरलीसुरली आस्थाही संपुष्टात आली.हे फक्त विरोधकच नाही तर भाजप समर्थकांनाही जाणवलं अन त्यांनी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचे दिसले.यामुळे येत्या काळात भाजपला आहे त्या राज्यातही सत्ता टिकवणे अवघड जाणार आहे.

भाजपसोबत सेनेने युती का तोडली याचं नेमकं कारण कुणी विशद केलेलं नाही.मुद्दा मुख्यमंत्री पद हा खरा नव्हता तर सरकारमध्ये राहून कामच न होण्याचा होता.युतीत असूनही फाईली क्लियर होत नव्हत्या.महसूल मिळत नव्हता.हा खरा इशू आहे.यातून सेनेची कोंडी झाली होती.

मग सरकारमध्ये राहून काय करायचं? त्यामुळे विरोधी पक्षाची भूमिका निभावत भाजपला त्यांनी कायम कोंडीत पकडलं.भाजपने मंत्र्यांना कमी अन पक्षाने जास्त कमवण्याचे धोरण राबवले.भाजप पक्षाचे ऍसेट पाहिले तर हे सहज लक्षात येईल.

अगोदर बेस मजबूत केला.कारण नेत्यांना मोठे केले.कमाई केली तरी नेते आज आहेत उद्या नसतील.पक्ष कायम राहणार आहे.भाजप आज सर्वात श्रीमंत पार्टी आहे.त्याची नोंद खरी फोर्ब्सच्या फ्रंटपेजला व्हायला हवीय.


भाजप ही शेटजीभटजीबनिया लोकांची पार्टी आहे.तसे इतरही पक्ष आहेत.परंतु त्यात वरील वर्ग जास्त प्रभावी नाही.भाजपमध्ये असणारे हे तीनही वर्ग कमालीचे निर्दयी अन निरंकुश सत्तेचे पुजारी आहेत.अन त्यासाठी ते कोणतेही नृशंस कांड करण्यात कमीपणा मानत नाहीत.हे आपण पाहिलं आहे.


लोकांना हे फार उशिरा लक्षात आलं.ते हिंदुत्ववादी म्हणतात हिंदू धर्माबद्दल बोलतात परंतु सर्वात जास्त नुकसान जर कुणी हिंदूंचे केले असेल देशाचे केले असेल तर ते आज भाजपने केल्याचे तुम्हाला दिसेल.जेएनयुत शिकणारी मुलं ही धर्माने बहुसंख्य हिंदू धर्मिय असणे हे ओघाने आलेच त्यांच्या मेंदूवर पाय देवून तीन पावलात सगळं व्यापून बहुजन हिंदूना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे भाजपचे धोरण आहे.हे आपण घडलेल्या गोष्टींवरून लक्षात घेऊ शकतो.


सरकारी शाळांमध्ये शिकणारा गरिब हा बहुजन हिंदू असतो अन हा वर्ग सर्वात जास्त आहे.उरलेला ज्यांना हिणवले जाते आरक्षण म्हणून हेटाळले जाते त्यांची टक्केवारी पाहिली तर ती दर्या में खसखस अशी असते.परंतु चित्र एवढं भयंकर मोठ्ठं करून रंगवलं जातं की त्यामुळे हे लोकच इथं 70% असल्याचा भ्रम हिंदू बहुजन वर्गाला होतो आणि मग आपल्याच पायावर धोंडे मारून घेणे सुरु होते.

इथे एक गोष्ट लक्षात घ्या,भारतात आता जवळपास सर्वच जातींना आरक्षण लागू आहे.ब्राह्मणांना 10% आहे.आणि मराठा समाजाला 16% माझ्या माहितीप्रमाणे फक्त  मुस्लिम समजातील काही घटक हे आरक्षणापासून वंचित आहेत.


नाका तोंडात पाणी जाईपर्यंत हे इथल्या बहुजन हिंदू वर्गाच्या लक्षातच येत नव्हतं.ते जेव्हा आलं तेव्हा हजारो सरकारी शाळा बंद होऊन शिक्षणाची दारे बंद झाली.शिष्यवृत्ती बंद,एडमिशन बंद परिणामी सिक्युरिटी गार्ड किंवा भाजीविकून रिक्षा चालवून कुटुंब जगवणाऱ्या कुटुंबप्रमुखाच्या पत्नीलाही मुलांच्या शिक्षणासाठी इतरांच्या घरी धुणीभांडी करायला जाणे किंवा इतर जोडधंदा करायला लागणे अपरिहार्य ठरलं.


प्राथमिक शिक्षण परवडत नाही.उच्चशिक्षण कसं परवडणार आहे? हा जीवघेणा प्रश्न समोर आहे.कारण यातून ज्या आत्महत्या झाल्यात त्याचा डाटा उघड केला जात नाही.


आपल्याकडे एकच गोष्ट जास्त केली जातेय.अन लोकांना त्यातच जास्त इंटरेस्ट आहे.एकवेळ खायला नसू दे मुलांना शिक्षण मिळू नये नोकरी मिळू नये सगळं चालेल पण मी "ह्यांची जीरवणार" ही जीरवा-जीरवी बहुजन हिंदू वर्गांच्या मुळावर उठली.अन ते त्यांची मुलं आज देशोधडीला लागली आहेत.


याचं कारण फुकाच्या इतिहासात रमणे अस्मिता कुरवाळत बसने अन यातून इतर समाजाला शत्रू समजून जीरवा जीरवी करणे यामुळे आपल्याला वाटलं आपण समोरच्याचे नुकसान केले परंतु याने आपल्या येणाऱ्या पिढ्यांचं किती मोठं नुकसान झालं हे कळायला उध्वस्त व्हावं लागलं.


देशात कुठेच नसणारा भाजप याच जीरवा जीरवीच्या धोरणातून 71% पोहोचली.अन डोक्यावर मिऱ्या वाटायला लागली.उदाहरणार्थ एकट्या बीफ बंदी या आचरट निर्णयाने शेतकऱ्यांचे किती मोठे नुकसान केलेय किती प्रमाणात कंबरडे मोडलेय याचा डाटा तपासला तर तुमच्या लक्षात येईल की आपणच भूल थापांना बळी पडून आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतलीय.


याबद्दलच्या डाटाची नीटपणे मांडणी शेतकरी वर्गासमोर करणे गरजेचे आहे.अन्यथा यातून तुम्ही काय मिळवलं हे समजायला तुम्हाला अनेक पिढ्या खपावं लागेल.काही राज्यात कायदा अन काही राज्यात बिझनेस धोरण राबवणे अन याला विरोध म्हणजे देशद्रोही राष्ट्रद्रोही लेबलं लावून समोरच्याला दाबणे यामुळे कुणी यांच्या नादी लागत नव्हतं.कारण शेवटी कितीही सत्य असलं तरी बहुसंख्यांच्या समोर तुम्ही चिरडले जाता.


सरकारी संस्था मोडीत काढून त्या धनदांडग्यांच्या हवाली करण्याचे धोरण देशाला गुलाम करून उध्वस्त करणारे षडयंत्र आहे.अन हे का केले जाते? या प्रश्नाचे उत्तर शोधा.ज्यांना देशाशी प्रेम आहे अशी व्यक्ती देशाची मालमत्ता कधीही विकू शकत नाही.तुम्ही देशभक्त आहात तर देशाची संपत्ती निलाम का करत आहात? हा साधा प्रश्न आहे.


एक लक्षात घेतलं पाहिजे ज्याअर्थी इथे बहुसंख्येने हिंदू बहुजन वर्ग आहे.त्या अर्थी सरकारी संस्था आस्थापने यात त्यांचीच संख्या प्रामुख्याने जास्त असणार हे ओघाने आलेच अन ते नैसर्गिक आहे.


असे असताना आपल्याच येणाऱ्या पिढ्यांचे भवितव्य उध्वस्त करून आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेतल्याचे चित्र आज देशात पाहायला मिळते आहे.


कारण सरकारी संस्था आस्थापने यात असणारी नोकरी आणि खाजगी मालकाकडे करत असलेली गुलामी यात जमीन अस्मानचा फरक आहे.हे तुम्हालाही माहिती आहे.माहिती असावं.याबद्दल जरा शांतपणे विचार करा.


एअर इंडिया सोबत तब्बल पाच सरकारी कंपन्या विक्री करण्याचे धोरण भाजपसरकारने राबायचा अट्टाहास सुरु केला आहे.हे तेव्हाच थांबेल जेव्हा सामान्य जनता याच्याविरोधात उभी राहील.


जनतेला हे कुठेतरी उशिराने का होईना कळायला लागलं अन मग आपण काय अन किती मोठी चूक केली हे त्यांच्या लक्षात आल्याने पुन्हा भाजपची पीछेहाट व्हायला लागल्याचे दिसते.71% वरून मग ती थेट 40% वर आली.ती सत्तेतून जोपर्यंत 0% होत नाही या देशाचं भलं होणार नाही हे लक्षात ठेवा.

 

- मिलिंद धुमाळे 

 

india today group

 

 

image credit - India Today Group