जागतिक शांतीदूत पुरस्कार देणारी संस्था कुणाची आहे?

By  milind dhumale on 

हाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी श्रीमती अमृता फडणवीस या कायम चर्चेत असतात.कधी त्यांच्या गायनाची चर्चा होते.तर कधी नृत्याची तर कधी सामाजिक कार्याची चर्चा होत असते.एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पत्नी असल्या तरी त्या सामान्य गृहिणी प्रमाणे जीवन जगताना दिसतातच परंतु आपल्या अंगभूत कलागुणांनी त्या विविधक्षेत्रात ठसा उमटवताना देखिल दिसतात.

असाच एक कौतुकाचा ठसा त्यांचा कार्यावर उमटलेला आहे.नुकताच त्यांना "जागतिक शांतीदूत" हा पुरस्कार जाहीर झाला.पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अनेकानी त्यांचे अभिनंदन केले.तर काहींनी त्या महाराष्ट्रातील महापुरावर काहीच बोलल्या नसल्याबद्दल शांतीदूत पुरस्कार मिळाला अशी खोचक प्रतिकिया दिली.

अमृता फडणवीस यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी हा सन्मान देण्यात आला. सामाजिक कार्य, मानवतेची सेवा आणि समाजात शांतता राखण्यासाठी केले गेलेले प्रयत्न याच्या आधारावर अमृता फडणवीस यांना जागतिक शांतीदूत म्हणून सन्मानित करण्यात आलं. सदर पुरस्काराचे स्वरूप एक फ्रेम, सन्मानपत्र, एक पीस हॅपर आणि चांदीचा नाणे असे आहे.

यावर सोशल मिडियात चर्चा होत असल्याने आमच्या टीमने जागतिक शांतीदूत  हा पुरस्कार देणाऱ्या संस्थेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. THE WORLD PEACEKEEPERS MOVEMENT. या नावाने रजिस्टर असणाऱ्या संस्थेचे कार्यालय हे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असून तीचे संस्थापक अध्यक्ष सर डॉ. ह्यूज हे आहेत.

डॉ. ह्यूज यांचे संपूर्ण नाव Dr.Huzaifa Khorakiwala असे आहे.नावावरून ते पाश्चिमात्य वाटू शकतात परंतु खोलात जाऊन माहिती घेतली असता ते भारतीय असल्याचे समजते.
व्होकार्ट या सुप्रसिद्ध हॉस्पिटलचे ते कार्यकारी संचालक असून The World Peacekeepers Movement माध्यमातून ते अनेक सामाजिक कार्य करत आहेत.


The World Peacekeepers Movement (TWPM) ही एक ऑनलाइन चळवळ आहे.फेसबुकच्या माध्यमातून यात जगभरातील 2 लाखांहून जास्त सामाजिक कार्यकर्ते जोडले गेले आहेत. ही चळवळ कृतज्ञता, क्षमा, प्रेम, नम्रता, देणे, धैर्य आणि सत्य अशा 7 शांती मूल्यांवर आधारित आहे.

 

संदर्भ - The World Peacekeepers Movement / वृतपत्र News18 Lokmat Aug 16, 2019 06:20 PM IST

 

~ Milind Dhumale