गार्गी कॉलेजमध्ये घडलेला भयानक प्रकार,आपली बहिण मुलगी खरंच सुरक्षित आहे? उद्या असेल?

By  milind dhumale on 

गार्गी कॉलेज (दिल्ली) हे युजीसी मान्यताप्राप्त असून देशातील टॉप कॉलेजमध्ये गणले जाते.नावही हिंदू धर्मीयच आहे.म्हणजे "जामियामिलीया" टाईप नाही कि आपण केवळ नावावरून तिथल्या मुली 'त्या टाईपच्याच' असतील अशी मानसिकता बनवावी.थोर सुसंस्कृत हो.आपण बाय डीफोल्टच उच्च संस्कारी अन विश्वगुरु.(हो विश्वगुरु होतंच पण काय? तर बुद्ध होता.आहे.तुम्ही स्वत:ला ते बिरूद लावून डिंग्या मारता पण तसं काही ना पुराणात मिळतं ना आता.मिळतं ते फक्त उपभोग अन विकृती )


या कॉलेजमध्ये कॉलेज फेस्टिवल सुरु आहे."रेवरी" नावाचा कार्यक्रम सुरु होता.त्यावेळी बाहेरचे शेकडो छपरी सॉरी सुसंस्कृत लोक आत घुसले. त्यांच्याकडे बनावट प्रवेश पत्रिका होत्या.आत घुसले,अन समोर मुलींचा मोहोळ.पिसाट नराधमांना काय करू काय नको असे झाले. लांडग्याप्रमाणे.तुटून पडले सगळे.


द्वितीय वर्षात शिकत असलेली पूर्वी चौधरी (हिंदू धर्मीयच बरं का) सांगते या छपरी जमावातील एकजण तीला म्हणाला "बॉयफ्रेंड मिळतायत,ट्राय कर,अनुभव घे"


गार्गी कॉलेजच्या कार्यवाहक प्रोमिला कुमार यांच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने धक्कादायक बातमी छापली आहे की विद्यार्थ्यांच्यामार्फत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.आम्ही पुरेसे कमांडो आणि बाउन्सर आणि पोलीस यांचा सुद्धा बंदोबस्त ठेवला होता,कॅम्पसचा एक भाग फक्त मुलींसाठी राखीव होता.त्याच्या मर्यादेला छेद देत जर मुली बाहेर हिंडत बसल्या असतील तर हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.


परंतु राज्यशास्त्राच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने सांगितले की एक विद्यार्थिनी कॉलेज प्रिन्सिपॉल कडे तक्रार घेऊन गेली होती.


तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या अन नाव न सांगण्याच्या अटीवर वैदेही या ( सिक्युरिटी रीझनमुळे नाव बदलेलं आहे.) विद्यार्थिनीने सांगितले की "मी दुपारी दीड वाजल्यापासून या फेस्टीव्हल मध्ये सहभागी होते,अंकल टाईप काही लोक आता घुसले जे मुलींना घाणेरड्या पद्धतीने स्पर्श करत होते.मला तिथून निघायचं होतं परंतु जमाव एवढा वाढला की निघणे अशक्य झाले.त्यावेळी बाऊन्सर्स ची संख्याही पुरेशी दिसत नव्हती.मी पाहिले एकजण पँँट खोलून शिश्न बाहेर काढून तिथून जाणाऱ्या मुलींवर रगडत होता,हा प्रसंग अतिशय भयानक होता"


कॉलेज गार्ड संदीप कुमारने जबानी दिलीय की "जो जमाव आत घुसला तो "जय श्रीराम" चे नारे देत होता.त्यांच्याकडे बनावट प्रवेश पत्रिका होत्या,आणि ते गेटला धक्के मारत होते"


संदीप पुढे सांगतात की "आमच्याकडे मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे शेवटी सिआरएफला बोलवावे लागले.पहिली तुकडी सायंकाळी 5 वाजता पोहोचली.त्यानंतर थोड्यावेळाने दुसरी तुकडी पोहोचली.त्यावेळीची परिस्थिती कथन करताना संदीप सांगतात की सगळीकडे अफरातफर माजली होती.विद्यार्थिनीना तिथून बाहेर पडायचे होते."


याच कॉलेजमध्ये अशाच प्रकारची घटना 2019 मध्ये सुद्धा झालेली आहे असे समजते.


महिला आयोग अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी सोमवारी दिल्ली पोलीस आणि कॉलेजप्रशासनाला नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे.


स्वाती मालीवाल म्हणाल्या "पोलिसांनी या घटनेत कोणतीही कारवाई केलेली नाही.कारवाई करण्यासाठी पोलिसांनी नेमकी कोणत्याप्रकारची तक्रार अपेक्षित आहे?" मागीलवर्षी सुद्धा अशीच घटना घडली आणि त्यावेळी अनेक तक्रारी देण्यात आल्या,त्यांचे काय झाले? मागीलवर्षी तक्रार करूनही कारवाई न झाल्याने यावर्षी जमावाला असे कृत्य करण्यास आणखी बळ मिळाले आहे.आणि त्यांनी विचार केला की आता आपण थेट कॉलेज कॅम्पसमध्ये घुसू शकतो."


हे सर्व पाहिलं की सत्ताधारी भाजपला जे हिंदू राष्ट्राचे स्वप्न पडलेय ते कसे असेल याचा प्रत्यय येतो अन काळजात धडकी भरते.आपली बहिण आपली लाडकी मुलगी अशाच कुणाकडून तरी चुरडून टाकली जात असेल?

या विचाराने अस्वस्थ व्हायला होतं.झुंडशाहीचा हा अविष्कार तुम्हाला फक्त मुस्लिम अन इतर धर्मियांच्या विरोधातच हिंसा करेल अशी खात्री असेल अन त्यामुळे तुमचा जीव सुखावत असेल तर वरील घटना तुमचे डोळे उघडायला पुरेशी आहे.असे मलातरी वाटते.


अर्थात आपल्या लाडक्या बहिणीच्या मुलीच्या आत्मसन्मान अन सुरक्षेसाठी तुम्ही कोणताही धोका पत्करू इच्छित नसालच.परंतु तुमच्या नकळत तुम्ही जे झुंडशाही अन धार्मिक धृविकरणाच्या जाळ्यात फसत चालले आहात.अन तुमच्या या गाफीलपणाची धर्मांध हिंसेची किंमत मात्र प्रिया जनांनाच अशाप्रकारे चुकवावी लागत असेल तर वेळीच शहाणे होणे इतरकुणासाठी सोडा आपल्या कुटुंबासाठी तर नक्कीच गरजेचं आहे.
पटतंय का?

बातमी सोर्स - बीबीसी हिंदी 

- मिलिंद धुमाळे 

gargi college delhi rss bjp hindu hindutvwadi.jpg