त्यागमूर्ती माता रमाई माऊली !!

By  milind dhumale on 

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मित्र वराळे हे धारवाडमध्ये लहान मुलांचे वसतिगृह चालवत.

डॉ.जेव्हा परदेशी गेले तेव्हा काही दिवसांसाठी रमाई या वसतिगृहात राहिल्या.वसतीगृहातील मुलं पुढील मैदानात खेळत असत.एक दोन दिवस ती लहान मुले खेळायला आलीच नाही.

म्हणून रमाईने याबाबत वराळे काकाना विचारले दोन दिवस झाली ही मुले कुठे गेली आहेत खेळायला आवारात का आली नाही.तेव्हा वराळेकाका म्हणाले ती लहान मुले दोन दिवसापासून उपाशी आहेत.

कारण वसतीगृहाला जे अन्न धान्याचे अनुदान महिन्याला मिळायचे ते अजून मिळालेले नाही ते मिळायला अजून तीन दिवस लागतील.अजून तीन दिवस या मुलांना उपाशीच रहावे लागेल असे वाटते

त्यावेळी रमाईनी लगेच आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या अंगठी काढून वराळेकाकांना देवून म्हणाल्या तुम्ही ह्या अंगठी-बांगड्या ताबडतोब विकून टाका किंवा गहान ठेवून ह्या आणि लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू घेवून या. मी या लहान मुलांना उपाशी नाही पाहू शकत.

त्यावेळी वराळेकाका त्या अंगठी-बांगड्या घेवून जातात आणि लहान मुलांसाठी जेवणाच्या वस्तू घेवून येतात. त्यादिवशी मुलं आनंदाने पोटभर जेवली. त्यांच्या तोंडावर आनंद ओसंडून वहात होता.हे पाहून रमाई आनंदी होते.तिचा आनंद गगनात मावत नव्हता.

त्यावेळी हि सगळी लहान मुले रमाबाईस "रमाआई" म्हणून बोलायला लागली.त्या क्षणापासून रमाबाई हि माता रमाई झाली.ती आपल्या सगळ्यांची आई झाली.

डॉ.बाबासाहेबांनी समाजासाठी जसे हाल सोसले झिजले त्याग केला त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी रमाआईने देखील अनेक गोष्टींचा त्याग करत डॉ.साहेबांना साथ दिली.

त्यांची आज जयंती,त्यानिमित्ताने
टीम जागल्याकडून
विनम्र अभिवादन आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा

mata ramai ramabai माता रमाई आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर