वंचित बहुजन आघाडीवरील सायबर बुलिंग!

By  Gunvant Sarpate on 

नक्की कुठून सुरुवात करावी माहिती नाहीय. मुद्देसूद नसेलच मांडणी, कारण हा प्रकार इतका किळसवाणा आणी नीच होता.
थोडं डिटेल मध्ये मांडायचं कारण इतकचं की ह्या विषयावर झाट देखील माहिती नसून पण आभाळ हेपलणारे भामटे इथं ढिगाने पडलेत.

ओके. थोडं बेसिक समजून घेऊ. मशीन लर्निंगमध्ये नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग नावाचा एक प्रकार असतो. त्यातली सेंटिमेंट ऍनलिसिस ही उपशाखा म्हणता येईल. ह्यात करतात काय तर की मानवी भाषा मशीनला नुसती शिकवायची नसते तर भाषेत नक्की काय भावना, मतं व्यक्त होतात ह्यावर भर असतो. ह्यावर खूप जोरात रिसर्च वगैरे सुरू आहेत. वेगवेगळ्या सिस्टम्सला मानवी भाषेतल्या संवेदना, त्याला असलेल्या ओपिनियनचे कांगोरे कळावेत हा त्या मागाचा हेतू. अर्थात तितकी अक्युरिसी असलेला अल्गोरिदम आजवर कुणीच बनवू शकलं नाहीय तो भाग वेगळा. पण सोशल प्लॅटफॉर्मवर ह्याचा उपयोग वेगळ्याच करणा साठी होतोय. इथं लिहलेलं कंटेंट राजकीय चष्म्यातून स्कॅन करत त्याला लेबल लावण्याचं खरं काम पहिल्यांदा कुणी केलं तर ते केम्ब्रिज अनलिटीकाने. केम्ब्रिज अनलिटीका प्रकरणात न्यूयॉर्क टाइम्स ने प्रदीर्घ अग्रलेख लिहला होता. कंटेंटला पोलराईज करून लोकशाहीची गळचेपी करताय म्हणून झकरबर्गवर सडकून टीका केली होती.

ही झाली पार्श्वभूमी. इंग्रजी भाषेबद्दल तसं होऊ शकत असा माझा समज होता. इंग्रजीची एखादी कादंबरी डेटासेट म्हणून अल्गोरिदमला फीड केली तर रिझल्ट बऱ्यापैकी म्हणजे पन्नास-साठ टक्याहुन अधिक येऊ शकतात, हे मला माहिती होतं. पण हे सगळंच प्रादेशिक भाषेत पण चालुय म्हटल्यावर धक्कादायक वाटलं.

सोपं उदाहरण अगोदर जेंव्हा फेसबुक वर फक्त लाईक ऑप्शन होतं तेंव्हा फेसबुक वरचं मराठी भाषेतलं हेट कंटेंट जरी रिपोर्ट केलं तरी जास्त काही व्हायचं नाही. पण जेव्हा पासून लव्ह, अँग्री, फनी, असं रिकायक्टचे ऑप्शन्स आले त्यांनतरच्या काळात मात्र हेटस्पीच रिपोर्ट केलं तर ते कंटेंट फेसबुक काही तासातचं ते कंटेंट हटवण्यात येतंय. तुम्ही पण बऱ्याच ठिकाणी 'This post is currently not available' हे बघितलचं असेल.

मला प्रश्न पडला, की फेसबुक ने मराठी भाषेसाठी हा सेंटिमेंट अनलिसीसचा अल्गोरिदम बनवलाय की काय? बनवला असेल तर प्रायमरी रिसर्च टीम, शिव्या, हेट स्पीचचा किंवा 'खरं आणी खोटं' ह्याचा डेटासेट त्यांना कुणी पुरवला? हे प्रश्न होतेच. पण फेसबुक ने जेंव्हा 'कांबळे' आडनाव घेऊन अँटी हरासमेंट कॅम्पेन उभं केलं तेंव्हा माझी खात्री झाली की हे सगळं एकतर सिलिकॉन व्हॅलीत बसलेले तन्मय चिन्मय असतील किंवा इन्स्टंट ऍड मधून पैसे लाटणाऱ्या प्रस्थापित मीडिया कंपनीज असतील.

आता हे सगळं मांडयचं कारणं म्हणजे वंचित बहुजन आघाडी ला सामना करावं लागलेलं विकृत सायबर बुलिंग. वंचितच्या अनेक प्रचारकांवर अचानक आलेलं रस्ट्रीक्शन्स. निवडणूकीच्या अगदी एका दिवसा आधी मयूर लंकेश्वर, मिलींद धुमाळे, आणी साक्या नितीन ह्यांची न्यूज फीड अचानक ब्लॉक करण्यात आली. वंचित आघाडीचं अधिकृत ट्विटर हँडल, हे काही काळा साठी रस्ट्रीक्ट करण्यात आलं. एवढचं नाही तर जागल्या ह्या पेजवर 7 दिवसाचं बॅन आलं. हा सगळा कोइन्सीडन्स नक्कीच नव्हता. फेसबुकवर #MaharastraWithVBA ह्या हॅशटॅगच्या अनेक पोस्टचा रीच कमी करण्यात येत होता. ह्या संबंधी मी फेसबुक टीम शी संपर्क साधला तर त्यांच्याकडून फक्त नेहमी सारखं पॉलीसीज समजून सांगणारा मेल आला.

आता ट्विटर कडं वळू. ट्विटर वर वंचित आघाडीने #MaharshtraWithVBA हा टॅग जोरदार ट्रेंड केला. कसलंही प्रशिक्षण नसताना, मोठे हँडल सोबत नसताना आणी विशेष म्हणजे कुठलंही व्हेरीफाईड अकौंटस नसतानाही, वंचित समर्थकांनी हा हॅशटॅग काँग्रेस राष्ट्रवादी आणी भाजपच्या नाकावर टिच्चून ट्रेंड घडवून आणला.

त्यांनतर लगेच हे रीच कमी करणं, हॅशटॅग व अकाउंटस् ला मास रिपोर्ट करण्याचा हलकटपणा इथल्या प्रस्थापित पक्षांनी आणी त्या संलग्न एजन्सीज नी केलंय. वंचितची मुद्देसूद मांडणी करणारे अनेक कार्यकर्ते ह्यामुळ हतबल झाले होते. ऐन मतदानाच्या तोंडावर न्यूज फीड ब्लॉक केली.

जागल्याचा डॅशबोर्ड पाहिला तर लाखो लोकां पर्यंत रीच आहे, पण #MaharshtraWithVBA ह्या हॅश टॅग मधून लाईव्ह आलं सुमारे चाळीस मिनिटं झिरो व्हीव्हज होते, कुणाला लाईव्ह मध्ये ऍड पण करता येत नव्हतं. मास रिपोर्टिंग ने इतके रस्ट्रीक्शन्स आणले होते. हे सगळं चीड आणणारं होतं.

इथल्या धनदांडग्या प्रस्थापित पक्षांना नक्की कसली भीती वाटायला लागलेली, की एजन्सीज ला हाती धरून हे असले हलकट प्रकार घडवून आणण्या पर्यंत मजल गेलेली? इथं चोवीस तास आग ओकनारे अनेक पेजस आहेत त्यावर काहीच कारवाई होते नाही, मग काही विशिष्ट पक्षाची भूमिका मांडणाऱ्या काही कार्यकर्त्यांवर व्हर्चुअली हल्ले का होतायत?

हे सरळ सरळ सायबर बुलिंग आहे. मुक्त संवादाच्या समाज माध्यमांवर काही आवाज उठू नये म्हणून जाणीवपूर्वक केलेली गळचेपी आहे. नीच आयटी सेल ने पडलेला व्हर्च्युअल मॉब लिचिंग, विकृत सायबर बुलिंग, मास अटॅक्सचा पायंडा कृपा करून महाराष्ट्रात आणू नका.